Posts

Showing posts from August, 2020

दहावीतील गुणांचा फुगवटा धोकादायक

  दहावीतील गुणांचा फुगवटा धोकादायक! दै. देशोन्नती संपादकीय प्रकाशित दि. १०.०८.२०२०         शिक्षण क्षेत्रासाठी मागील आठवडा दोन  घटनांनी महत्त्वपूर्ण ठरला. गेल्या तीस वर्षानंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि राज्यात माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला. यंदाच्या दहावीच्या निकालाचे आकडे बघून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले गेले असतील. हा निकाल पाहून खडतर परिश्रम आणि अभ्यासाने ही मुले हुशार झाली की बोर्डाने हुशार बनवून टाकली? हा प्रश्न उपस्थित होतो.          यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन राज्याच्या निकालाची टक्केवारी ९५.३० टक्क्यावर जाऊन पोहोचली आहे. १९७५ साली राज्यात प्रथमच १०+२ या सूत्रानुसार दहावीची परीक्षा घेण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच गेल्या पंचेचाळीस वर्षातल्या सर्वोच्च निकालाची नोंद या वर्षीच्या निकालाने केली आ...

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लेख

दै. विदर्भ मतदार मध्ये दि. २६ जून २०२० रोजी प्रकाशित लेख  सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ : राजर्षी शाहू                 मिळालेली सत्ता ही केवळ राजवैभव व राजविलास यांच्या उपभोगाकरिता नसते तर त्या सत्तारुपी तलवारीने समाजातील शोषित, वंचित, रंजल्या, गांजलेल्यांच्या अधिकारांचे रक्षण करायचे असते हा आदर्श संपूर्ण जगाला घालून देणाऱ्या लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची आज १४६ वी जयंती...२ एप्रिल १८९४ ला गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहूंचे राज्यारोहण झाले. त्यावेळी भारतात स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत असताना ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील संस्थाने खालसा करण्याचे धोरण आखले होते. अशावेळी ब्रिटिशांना विरोध न करता त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून सत्तेच्या माध्यमातून संस्थानातील बहुजन समाजाची सर्वांगीण उन्नती साधण्याचा धोरणी व विवेकी मार्ग राजर्षी शाहू महाराजांनी पत्कारला होता. आधी सामाजिक सुधारणा व नंतर राजकीय सुधारणा या म. फुले, आगरकरांच्या विचारांचे ते वारस होते.        १८९९ साली घडलेल्या वेदोक्त प्रकरणाम...

दै.देशोन्नती दि.३०जुलै २०२० कोरोना काळातील शिक्षणात पालकांची भूमिका!

कोरोनाकाळातील शिक्षणात पालकांची भूमिका!  कोरोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीने राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. शालेय शिक्षण विभाग परिपत्रकांवर परिपत्रकांचा भडीमार करुन ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. ऑनलाइन शिक्षणाची ही संकल्पना शहरी भागातून थोड्याफार प्रमाणात उपयोगी पडत आहे. संपूर्ण ग्रामीण भागाबरोबरच शहरातील बऱ्याचशा भागात मात्र आवश्यक साहित्य व सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे शिक्षणाची गंगा पुनःश्च प्रवाहित करण्यात ऑनलाइन शिक्षणप्रणाली यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. मुलांचे शिक्षणचक्र पूर्णपणे थांबल्याने पालकवर्ग आपल्या पाल्यांच्या भवितव्याने चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. केवळ चिंता केल्याने हा प्रश्न सुटणारा नाही हे पालकांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थी-पालक या शैक्षणिक त्रिकोणातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या पाल्यांच्या शिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी पालकांनी आपल्या भूमिकेत थोडासा बदल करून पालकाबरोबरच शिक्षकाची भूमिका स्वीकारल्यास आपल्या पाल्याचे शिक्षण पुन्हा सुरू होण्यास...